Breaking News

कोरोना रुग्णांची आरटीपीसीआर टेस्टसह अॅण्टीजेन टेस्टही करा

अ‍ॅड. मनोज भुजबळ यांची मागणी

पनवेल : प्रतिनिधी

पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोनाचा झपाट्याने होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रुग्णांची आरटीपीसीआर टेस्टसह अ‍ॅण्टीजेन टेस्टसुध्दा करण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ यांनी महापौर आणि आयुक्तांना पत्र देऊन केली आहे.

शासनाच्या निर्देशाप्रमाणे कोरोना लॉकडाऊन काळात कामावर जाणार्‍या प्रत्येक नागरिकाला आरटीपीसीआर टेस्टचे सर्टिफिकेट दर 15 दिवसांनी घेणे बंधनकारक केले आहे. कोरोनाच्या तपासणीसाठी संशयित रुग्णाची लॅबमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. महापालिकेकडे मनुष्यबळ कमी असल्याने टेस्टचे सर्टिफिकेट मिळण्यास वेळ लागत आहे. त्यातच शासन नियमाप्रमाणे कामावर जाणार्‍या लोकांचीही निगेटिव्ह सर्टिफिकेट घेण्यासाठी गर्दी होत आहे. त्यामुळे खरोखरच त्रास होत असलेल्या रुग्णाला तासंतास रांगेत उभे राहावे लागत आहे.

आरटीपीसीआर टेस्टचे रिपोर्ट येण्यास तीन ते चार दिवस लागतात. त्यामुळे असा रुग्ण रिपोर्ट येईपर्यंत घरात, आजूबाजूला आणि बाजारात वावरत असतो. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे दिसून येत आहे. याशिवाय रिपोर्ट उशिरा आल्याने रुग्णावरही वेळेवर उपचार न झाल्याने त्याची परिस्थिती गंभीर  होत आहे. तो दगावण्याची शक्यता वाढत आहे. यासाठी आशा प्रकारे त्रास होणारी व्यक्ती टेस्ट करण्यासाठी आली असता तिला प्राधान्य देऊन तिची आरटीपीसीआर टेस्ट बरोबरच अ‍ॅण्टीजेन टेस्ट करावी. त्यामुळे ती व्यक्ती पॉझिटिव्ह असल्यास तिच्यावर लगेच उपचार करता येतील व तिच्यापासून इतरांना प्रादुर्भाव होणार नाही, असे अ‍ॅड. मनोज भुजबळ यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply