Friday , June 9 2023
Breaking News

आयबीएस परीक्षेत शेलू गावातील तरुण देशात 95वा

कर्जत : बातमीदार

तालुक्यातील शेलू गावातील समीर अशोक डुकरे यांनी कृषी अर्थशास्त्राची पदवी मिळविताना आयबीएस परीक्षेत देशात 95वा क्रमांक प्राप्त केला आहे. त्यांची  तत्काळ महाराष्ट्र बँकेच्या अ‍ॅग्रिकल्चर फिल्ड मॅनेजर पदावर नियुक्ती झाली आहे. समीर डुकरे यांनी शेलू गावात प्राथमिक, तर दहावीपर्यंतचे शिक्षण शेलू बांधिवली येथील माध्यमिक शाळेत आणि बारावीपर्यंतचे शिक्षण कर्जत शहरातील अभिनव ज्ञान मंदिर प्रशालेत घेतले. त्यानंतर दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात कृषी पदवीचे शिक्षण घेतले. कृषी अर्थशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी त्यांनी राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात प्रवेश घेतला. कृषी अर्थशास्त्राची परीक्षा देशस्तरावर होत असते आणि त्या पदव्युत्तर परीक्षेत 84 टक्के गुण मिळवून समीर डुकरे यांनी देशात 95वा क्रमांक पटकावला आहे. याबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.

Check Also

कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर शांतता कमिटीची बैठक

पनवेल : वार्ताहर सध्या महाराष्ट्रात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व स्टेटस वायरल होत असल्याने हिंदुत्ववादी …

Leave a Reply