Breaking News

कबड्डीपटू मयूर कदमचे जोरदार स्वागत

उरण ः वार्ताहर

उत्तर प्रदेशमधील अयोध्या येथे झालेल्या 68व्या वरिष्ठ गट राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राने तृतीय क्रमांक प्राप्त केला. या संघातून खेळणारा उरण तालुक्यातील बोकडविरा येथील अष्टपैलू खेळाडू मयूर जगन्नाथ कदम याचे गावात जोरदार स्वागत करून अभिनंदन करण्यात आले. मूळचा अलिबाग तालुक्यातील तळवली गावचा मयूर बालपणापासून बोकडविरा गावचा रहिवासी असून, तो गणेश क्लब संघाकडून खेळतो. त्याची महाराष्ट्रातील 115 खेळाडूंमधून राज्य कबड्डी संघात राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली होती. अवघ्या 23 वर्षांच्या मयूरने महाराष्ट्राकडून खेळताना धडाकेबाज खेळी करून राहुल चौधरी, नितीन तोमर (उत्तर प्रदेश) नवीन कुमार, सुरजीत (सेनादल)सारख्या धडाकेबाज प्रो स्टार खेळाडूंना आपल्या रांगड्या खेळाने बाद केले. त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply