Breaking News

केंद्राकडे बोट दाखवून राज्य सरकार स्वतःचे अपयश लपवू शकत नाही; रामदास आठवलेंचा टोला

मुंबई ः प्रतिनिधी

रेमडेसीवीरसह सर्व औषधे महाराष्ट्राला मिळतील. औषधे पुरवू नका असे कोणतेही सरकार आदेश देऊ शकत नाही. राज्य सरकार केंद्रावर खोटे आणि खोडसाळ आरोप करीत आहे. महाविकास आघाडी सरकार केंद्राकडे बोट दाखवून आपले अपयश लपवू शकत नाही, असा टोला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी लगावला आहे. कोरोनाचा कहर रोखण्याची जबाबदारी राज्य सरकारचीसुद्धा आहे. त्यामुळे या परिस्थितीत आरोपांचे राजकारण कोणी करू नये, असे आवाहनही आठवले यांनी रविवारी (दि. 18) मुंबईत बोलताना केले. कोरोनाच्या महामारीमुळे मोठ्या प्रमाणात मृत्यू होत आहेत व त्यास पंतप्रधान मोदी जबाबदार असल्याचा खोटा, खोडसाळ आरोप राज्य सरकार करीत आहे. वास्तविक देशात कोरोनाचा कहर रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी चांगले काम करीत आहेत. सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी, राज्यपालांशी संवाद साधत आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या महाविकास आघाडीने दुतोंडी भूमिका घेऊ नये. केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला लस आणि ऑक्सिजन, रेमडेसीवरसह सर्व औषधांचा पुरवठा महाराष्ट्राला करण्यात येत आहे. राज्य सरकारने कोरोनाच्या मुद्द्यावर राजकारण करू नये आणि खोटे, खोडसाळ आरोप केंद्र सरकारवर करू नये, असे आठवलेंनी म्हटले आहे. मला रोज मुंबईसह राज्यातून फोन येत आहेत की रुग्णांना बेड मिळत नाहीत, रुग्णांची गैरसोय होत आहे.कोरोनाच्या काळात रुग्णांना सुविधा पुरविण्यात मुंबई महापालिका आणि राज्य सरकार अपयशी ठरले आहे, मात्र राज्य सरकार केंद्राकडे बोट दाखवून ते आपले अपयश लपविण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत, अशी टीकाही आठवले यांनी केली.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply