Breaking News

देशातील रुग्णसंख्येचा नवा उच्चांक; एकूण दीड कोटींचा टप्पाही पार

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 14 कोटींवर गेली आहे, तर लाखो लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतातही कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, देशातील रुग्णसंख्येने आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात सोमवारी (दि. 19) सकाळी संपलेल्या 24 तासांमध्ये कोरोनाचे तब्बल दोन लाख 73 हजार 810 नवे रुग्ण आढळून आले आहेत, तर एक हजार 619 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे आता भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून, रुग्णांची एकूण संख्या एक कोटी 50 लाख 61 हजार 919वर पोहचली आहे, तर कोरोनामुळे देशात 1 लाख 78 हजार 769 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. दुसरीकडे देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 19 लाख 29 हजार 329 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर एक कोटी 29 लाख 53 हजार 821 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून, त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
महाराष्ट्रात दर तीन मिनिटाला एका कोरोनाबाधिताचा मृत्यू
मुंबई ः महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती अधिक चिंताजनक होत चालली आहे. धक्कादायक म्हणजे राज्यात दर तीन मिनिटाला एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू होत असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे.
महाराष्ट्रात कोरोना संसर्ग झपाट्याने पसरत असून, रविवारी 68 हजार 631 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले, तर 503 रुग्णांचा मृत्यू झाला. ही एका दिवसातील राज्यातील सर्वांत मोठी आकडेवारी आहे. राज्यात दर तीन मिनिटाला एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे, तसेच एका तासात दोन हजारांहून अधिक जणांना कोरोनाची लागण होत आहे.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply