Breaking News

वर्तमानपत्र विक्रेत्यांना मास्क, सॅनिटायझरचे वाटप

बँक कर्मचारी संघटनेच्या स्थापना दिनी सामाजिक उपक्रम

पनवेल : वार्ताहर

बँकिंग उद्योगातील बहूसंख्य असलेल्या एआयबीईए (बँक कर्मचारी) संघटनेने आपला 76वा स्थापना दिन भारत भारत मोठ्या उत्साहाने साजरा केला. या वेळी भारत भारत विविध ठिकाणी सामाजिक उपक्रम सुद्धा राबविण्यात आलेत. त्याच अनुषंगाने संघटनेचे पदाधिकारी अरविंद मोरे यांनी पनवेलमधील वर्तपानपत्र विक्रेत्यांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.

महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईस फेडेरेशनचे जनरल सेक्रेटरी देविदास तुळजापूरकर यांनी जनतेला आवाहन करणारे परिपत्रक संपूर्ण महाराष्ट्रात जारी केले. या परिपत्रकात जनतेचा पैसा जनतेच्या भल्यासाठी नाही कॉर्पोरेटच्या लुटीसाठी हा संदेश देण्यात आला. ह्या परिपत्रकात राष्ट्रीयकृत बँकांनी किती दैदिप्यमान प्रगती केली ह्याचा सविस्तर लेखाजोखाच मांडला. सरकार सध्या बँकांचे खासगीकरण करू पहाते आहे, परंतु संघटनेचे म्हणणे हे आहे की बँकांचे खासगीकरण हे जनसामान्यांच्या हिताचे नाही. खासगीकरण केल्यामुळे जनसामान्यांना बँकिंग सुविधा मिळणार नाही. जनसामान्यांना राष्ट्रीयकृत बँकांनी भरपूर मदत करून देशाची प्रगती कशी झाली ह्या बाबत जनतेला संघटना जागृत करीत आहे.

संघटनेच्या परिपत्रकाद्वारे सर्व नागरिकांना पंतप्रधान व सभापती, लोकसभा, नवी दिल्ली यांना निवेदन देऊन सरकारने बँक खासगीकरणाच्या कार्यवाहीचा पुनर्विचार करण्याचे आवाहन सुद्धा करण्यात आले. संघटनेचे पदाधिकारी व सभासद जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करीत आहे. ह्या मोहिमेला सर्व स्तरावरून चांगला प्रतिसाद मिळत आहे. एआयबीईए संघटनेने 75 वर्षात बँक कर्मचार्‍यांच्या अधिकारांसोबत सामाजिक जाणिवेचे भान ठेऊन अनेक उपक्रम लॉकडाऊनच्या काळात सुद्धा राबविले आहेत.

असाच एक उपक्रम स्थापना दिनानिमित्त संघटनेने पनवेल शहरातील सर्व वर्तमानपत्र वाटप करणार्‍या मुलांना मोफत मास्क वा सॅनिटायझर करण्यात आले. संघटनेचे पदाधिकारी अरविंद मोरे यांनी पनवेल शहरातील प्रमुख वर्तमानपत्र विक्रेता अविनाश पडवळ यांना व त्यांच्या मुलांना 200 मास्क व 100 सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.

Check Also

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …

Leave a Reply