Breaking News

केबीपी कॉलेजतर्फे शिवस्वराज्य दिन सोहळा

नवी मुंबई : बातमीदार

कर्मवीर भाऊराव पाटील (केबीपी) कॉलेज वाशी यांच्यातर्फे सोमवारी (दि. 6) शिवस्वराज्य दिन सोहळा आयोजित केला केला. त्यामध्ये सकाळी वाशी येथील छत्रपती शिवाजी चौकामध्ये शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला एनसीसी कमांडर व महाविद्यालयाच्या प्राचार्या यांनी हार घालून अभिवादन केले तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विद्यार्थ्यांनी स्वयंसेवकांनी लेझीम ढोल ताशाच्या गजरात अभिवादन केले. यानंतर शिवज्योत शिवाजी चौकातून गावदेवी मंदिर ते कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज वाशी अशी शिवगर्जना व सर्व धर्म समभाव  संदेश देत जनजागृती रॅली काढण्यात आली. या शिवज्योत रॅलीमध्ये एनएसएस स्वयंसेवक, एनसीसी कॅरेट महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर सेवक असे एकूण 200 जन सहभागी झाले होते. महाविद्यालयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व निबंध स्पर्धा आयोजित केली तसेच प्रा. रवींद्र पाटील (रा फ नाईक महाविद्यालय, कोपरखैरणे) यांचे लोकशाहीचा शिवराज्याभिषेक या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. तसेच गड किल्ले यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन महाविद्यालयात करण्यात आले. या वेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शुभदा नायक, सेवा योजनेचे प्रकल्प अधिकारी व प्रा. डॉ. प्रकल्प अधिकारी भाले, एनसीसी ऑफिसर भागवत व गायत्री यांचे आदींचे सहकार्य लाभले.

Check Also

पनवेलच्या झोपडपट्टी पुनर्वसनासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांचा पाठपुरावा

मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका क्षेत्रातील झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा आणि त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न …

Leave a Reply