Breaking News

माजी विद्यार्थी सीकेटी कॉलेजचे नाव उज्ज्वल करतील

पनवेल : प्रतिनिधी

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर महाविद्यालयाला ए प्लस दर्जा असल्यामुळे हे सर्व माजी विद्यार्थी कॉलेजचे ए प्लस ग्रेड आहेत. त्यामुळे हे विद्यार्थी जिथे जातील तिथे कॉलेजचे नाव उज्ज्वल करतील, असा विश्वास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त केला. महाविद्यालयाची प्रगती समाधानकारक असून विद्यार्थ्यांनी आपले भवितव्य या महाविद्यालयातून घडवावे, असे आवाहन त्यांनी केले.

चांगू काना ठाकूर महाविद्यालयात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त माजी विद्यार्थी मेळावा 2019 आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे अध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भूषवले. प्रमुख पाहुणे सिडको अध्यक्ष, आमदार प्रशांत ठाकूर, पाहुणे म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष आणि भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, माजी उपमहापौर चारुशिला घरत, नगरसेवक नितीन पाटील, नगरसेवक अजय बहिरा, डॉ. सिध्देश्वर गडदे,                             

  शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव जनार्दन भगत, महाविद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय प्रा. वसंत डी. बर्‍हाटे, उपप्राचार्य डॉ. एस.के.पाटील आदी उपस्थित होते.

माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर सातारा येथे शिक्षणाला होते. बालपणीच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला. रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचा केक या वेळी कापण्यात आला. कॉलेजच्या विकास समितीमध्ये किती मुले काम करायला इच्छुक आहेत, असे त्यांनी विचारले असता जवळजवळ सर्वच विद्यार्थ्यांनी हात उंचावून प्रतिसाद दिला. याबाबत रामशेठ ठाकूर यांनी समाधान व्यक्त केले.

महाविद्यालयाच्या वतीने माजी विद्यार्थी संघाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. माजी विद्यार्थी व महाविद्यालय यांच्यामधील स्नेहसंबंध अधिक दृढ होण्याच्या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

आमदार प्रशांत ठाकूर यांनी युवकांसाठी उपलब्ध असलेल्या रोजगाराबाबत माहिती दिली. कॉलेजचे माजी विद्यार्थी कॉलेजचे ब्रँड अम्बॅसिडर असतात, असे ते म्हणाले. येत्या 8 जून होणार्‍या मेळाव्याचा युवकांनी लाभ घेण्याचे आवाहन केले.

माजी विद्यार्थी संघाचे सहसचिव किरण बडे यांनी मनोगत व्यक्त केले. प्राचार्य प्रा. वसंत डी. बर्‍हाटे यांनी आपल्या भाषणात कॉलेजला स्वायत्तता दर्जा दिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. या वेळी कॉलेजच्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. आर. व्ही. येवले यांनी प्रस्तावना केली. माजी विद्यार्थी संघाने वर्षभर केलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला.

या कार्यक्रमात माजी विद्यार्थी संघाच्या  865 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या वेळी सर्व विद्यार्थ्यांना भोजन देण्यात आले.

गणेश जगताप यांनी एक तासाचा सांस्कृतिक मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. आर. व्ही. येवले यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माजी विद्यार्थी संघाचें सर्व पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.

Check Also

खासदार बारणेंच्या विजयासाठी पनवेलमध्ये जोरदार प्रचार

आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांचा सहभाग पनवेल : रामप्रहर वृत्त मावळ …

Leave a Reply