Breaking News

कोविड रुग्णालयांत व्हिडीओ यंत्रणा कार्यान्वित करा

सभागृह नेते परेश ठाकूर यांची आयुक्तांकडे मागणी

पनवेल ः रामप्रहर वृत्त
महानगरपालिका हद्दीतील कोविड रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर होत असलेले औषधोपचार व देखभाल व्यवस्था रुग्णांच्या नातेवाइकांना पाहता यावी यासाठी व्हिडीओ यंत्रणा कार्यान्वित करावी, अशी मागणी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी पनवेल मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे केली आहे.
पनवेल महानगरपालिका हद्दीतील रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या कोविड रुग्णाला त्याच्या नातेवाइकांना पाहता यावे यासाठी त्या-त्या रुग्णालयांत व्हिडीओ पद्धतीची यंत्रणा कार्यान्वित करण्यात यावी, अशी मागणी प्रभाग समिती ’क’ सभापती हेमलता म्हात्रे यांनी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडे केली होती. त्या अनुषंगाने सभागृह नेते परेश ठाकूर यांनी आयुक्त सुधाकर देशमुख यांना त्या संदर्भात उपाययोजना करण्यासाठी निवेदन दिले आहे.    
या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, कोविड रुग्णालयांत दाखल असलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांना इतर आजाराच्या रुग्णांप्रमाणे संपर्क करता येत नाही. सध्याची कोरोनाची भयावह स्थिती पाहता नातेवाइकांना आपल्या रुग्णाविषयी नेहमी चिंता वाटत असते. त्यामुळे अनेक रुग्णांचे नातेवाईक सतत चौकशी करीत असतात. अशातच योग्य माहिती न मिळाल्याने त्यांच्या चिंतेत भर पडते. रुग्ण आणि नातेवाइकांमध्ये योग्य समन्वय झाल्यास दोघांनाही दिलासा मिळून रुग्णाला उपचारासाठी बळ मिळेल. त्यामुळे या बाबीचा विचार करून व्हिडीओ पद्धतीची यंत्रणा रुग्णालयात बसविण्यात यावी, असे निवेदनात अधोरेखित करण्यात आले आहे.

Check Also

राज्यस्तरीय 11व्या अटल करंडक एकांकिका स्पर्धेचे आयोजन

विजेत्या एकांकिकेला एक लाख रुपये आणि मानाचा अटल करंडक पनवेल ः रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ …

Leave a Reply