Breaking News

महाविकास आघाडीला पंढरपूरमध्ये दे धक्का!; भाजपचे समाधान आवताडे विजयी

पंढरपूर ः प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेससह महाविकास आघाडीकडून प्रतिष्ठेच्या करण्यात आलेल्या पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भाजपने बाजी मारली आहे. भाजपचे समाधान आवताडे यांनी राष्ट्रवादीचे भगिरथ भालके यांचा 3716 मतांनी पराभव करीत हा मतदारसंघ भालके यांच्या ताब्यातून हिसकावून घेतला आहे. गेली 11 वर्षे भगिरथ यांचे वडील आमदार भारत भालके या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करीत होते.आमदार भारत भालके यांच्या अकाली निधनामुळे पंढरपूर मतदारसंघात ही पोटनिवडणूक लागली होती. त्यात भाजपने समाधान आवताडे यांना, तर राष्ट्रवादीने भारत भालके यांचे पुत्र भगिरथ भालके यांना उमेदवारी दिली होती. आवताडे यांनी भालके यांचा पराभव केला आहे. जनतेने ठाकरे सरकारविरोधात कौल दिल्याची प्रतिक्रिया आवताडे यांनी दिली.

Check Also

‘हिंद दी चादर’ गुरू तेग बहादूर यांचा 350वा शहिदी समागम

दोन दिवसीय भव्य कार्यक्रमासाठी खारघर सज्ज पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी …

Leave a Reply