Breaking News

‘वानखेडे’लाही चक्रीवादळाचा फटका; साईड स्क्रीनचे नुकसान

अहमदाबाद ः वृत्तसंस्था

तौक्ते वादळाने महाराष्ट्र किनारपट्टीला हादरवून सोडले. मुंबईतही अनेक ठिकाणी सोसाट्याच्या वार्‍यामुळे पडझड झाली. या वादळाचा वानखेडे स्टेडियमलाही फटका बसला. वादळामुळे स्टेडियमच्या नॉर्थ स्टॅण्डच्या साईड स्क्रीनचे नुकसान झाले आहे. तौक्ते वादळाने मुंबईकडून नंतर गुजरातच्या दिशेने कूच केली. तत्पूर्वी, त्याने वानखेडे स्टेडियमवरील 16 फुट उंचीच्या साईडस्क्रीनला नुकसान पोहोचवले. ही साईडस्क्रीन वादळी वार्‍यामुळे पडली आहे. 2011मध्येही ही साईडस्क्रीन पडली होती.  टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री हेही वादळाची ताकद पाहून चक्रावून गेले. तौक्ते वादळ मुंबईकरांची झोप उडवत होते तेव्हा शास्त्रींनी सोशल मीडियावरून वादळाचे वर्णन केले. ते म्हणाले, वादळ हे वादळच असते. तो आताही सुरू आहे आणि हे वादळ आणखी नुकसान करू नये यासाठी फिंगर क्रॉस केले आहे.

Check Also

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …

Leave a Reply