Tuesday , March 28 2023
Breaking News

ड्युमिनीची निवृत्ती

जोहान्सबर्ग : वृत्तसंस्था

दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू जेपी ड्युमिनीने वर्ल्ड कपनंतर वन डे क्रिकेटमधून निवृत्त होणार असल्याची घोषणा केली, मात्र आफ्रिकेकडून ट्वेंटी-20 क्रिकेट संघासाठी उपलब्ध असल्याचे त्याने सांगितले. ड्युमिनीने सप्टेंबर 2017मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.

‘गेले काही महिने मी संघाबाहेर आहे आणि आता मला पुन्हा संधी मिळाली आहे. विश्रांतीच्या या काळात मी भविष्याबाबतचा विचार केला. हा निर्णय घेणे माझ्यासाठी सोपे नव्हते, पण आता मला कुटुंबीयांना वेळ द्यायचा आहे. मी आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक ट्वेन्टी-20 सामने खेळत राहणार आहे,’ असे ड्युमिनी म्हणाला.

Check Also

जलतरणपटू प्रभात कोळीचा भीमपराक्रम

न्यूझीलंडची कूक स्ट्राईट खाडी पोहून केली पार सात आव्हाने पूर्ण करणारा ठरला सर्वांत युवा स्विमर पनवेल …

Leave a Reply