Breaking News

देशात 30 जूनपर्यंत निर्बंध कायम

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

देशातील कोरोनाची दुसरी लाट ओसरण्यास सुरुवात झाली आहे. तरीही रुग्णसंख्या मोठी आहे. त्यामुळे देशात सध्या सुरू असलेले निर्बंध 30 जूनपर्यंत कायम राहतील, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.केंद्रीय आरोग्य सचिव लव अगरवाल यांनी ही माहिती दिली. गेल्या महिन्यात म्हणजे 25 एप्रिल रोजी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एक निवेदन जारी करून देशातील ज्या जिल्ह्यांमध्ये 10 टक्क्यांहून जास्त पॉझिटिव्हिटी रेट आहे किंवा ज्या जिल्ह्यांमध्ये 60 टक्क्यांहून जास्त बेड्स रुग्णांनी व्यापले आहेत अशा जिल्ह्यांवर जास्त लक्ष देण्याच्या सूचना राज्य सरकारांना दिल्या होत्या. त्या सूचना आताही कायम ठेवण्यात आल्या आहेत. देशात 44 दिवसांनी कोरोनाबाधितांची सर्वांत कमी संख्या नोंदवण्यात आली आहे. गेल्या 24 तासांत एक लाख 86 हजार नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 3660 कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. तर दोन लाख 59 हजार 459 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. म्हणजेच, एकूण सक्रिय रुग्णसंख्येपैकी काल दिवसभरात 76,755 रुग्ण कमी झाले आहेत. यापूर्वी बुधवारी 211,298 लाख नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती. तर 3847 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला होता.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply