Breaking News

आरोग्य केंद्रातील सेवकांना मदत

पनवेल : रामप्रहर वृत्त

गुळसुंदे येथील ब्रह्मवृंद संचलित श्री राम मारुती देवस्थान व सिद्धेश्वर देवस्थान यांच्या अध्यक्षतेखाली आपटा प्राथमिक आरोग्य केंद्रातल्या 28 सेवकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले गेले. यामध्ये साखर, चहा, तेल, मसाला इत्यादी वस्तूंचा समावेश होता. ही मदत त्यांना कोरोनाकाळातल्या त्यांच्या योगदानाबद्दल देण्यात आली.

या वेळी देवस्थानचे विश्वस्त प्रमोद विद्धंस, रवींद्र जोशी, यंशवत जोशी, विजय रा. जोशी, विजय वि. जोशी, गणेश जोशी, प्रकाश जोशी, आपटा आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवक व अधिकारी माधव नलावडे, नवलसिंग पवार, अशोक म्हात्रे, नमिता पाटील. अंकुश कोळेकर आदी उपस्थित होते.

Check Also

बॉबी @५३ वर्षे; आजही तारुण्यात असलेला प्रेमपट

चित्रपट रसिकांच्या पिढ्या ओलांडल्या, बदलल्या. चित्रपट पाहण्याच्या पध्दतीत बदल होत गेले, रेडिओ ते यू ट्यूब …

Leave a Reply