Breaking News

ग्रामीण भागाच्या विकासासाठी कटीबद्ध

आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रतिपादन; चिखले येथे मंदिर जिर्णोद्धाराचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्त
ग्रामीण भागाच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील आणि कटीबद्ध राहणार असल्याची ग्वाही आमदार प्रशांत ठाकूर यांनी चिखले येथे दिली आहे. चिखले गावचे जागृत देवस्थान असलेल्या श्री गिरोबा मंदिराचा जिर्णोद्धार भूमिपूजन सोहळा गुरुवारी (दि. 15) मोठ्या उत्साहात झाला.
या जिर्णोद्धारच्या कामाचा शुभारंभ आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, भुपेंद्र पाटील, शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे, योगेश लहाने, रामदास खेत्री, उपसरपंच प्रवीण पाटील, माजी सरपंच नामदेव पाटील, सिताराम पाटील, ओबीसी मोर्चा तालुका अध्यक्ष अप्पा भागीत, ज्ञानेश्वर मेढेकर, हिरामण पाटील, राम फडके, रमेश गडकरी, रवींद्र गडकरी, योगेश पाटील, गणेश पाटील, विजय पाटील, दत्तात्रय पाटणकर, मंगेश पाटील, भालचंद्र पाटील, मच्छींद्र पाटील, लक्ष्मणमहाराज, निलेशमहाराज आदी उपस्थित होते.

Check Also

सिडको प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याबाबत बैठक

प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश करा -आमदार प्रशांत ठाकूर मुंबई : रामप्रहर वृत्त सिडको प्रकल्पग्रस्तांनी …

Leave a Reply