Breaking News

रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयाचा बारावीच्या परीक्षेत 100% निकाल

पनवेल : रामप्रहर वृत्त – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी 2019-20 मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल गुरुवारी (दि. 16) जाहीर करण्यात आला. बारावी परीक्षेत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे खारघर, ओवेपेठ येथील रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल 100 टक्के लागला आहे. या परीक्षेत विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.

विज्ञान शाखेमध्ये विद्यालयातून 70 विद्यार्थी बसलेले असून त्यातील चार विद्यार्थ्यांना विशेष प्राविण्या मिळाले आहे. तर प्रथम श्रेणीत 41 विद्यार्थी व द्वितीय श्रेणीस 25 विद्यार्थी आहेत. यामध्ये प्रथम क्रमांक श्रुती गुरूनाथ तेलवणे 84.46 टक्के, द्वितीय अब्दुला शामसुददीन खान 81.23 टक्के, तृतीय रजत जयप्रकाश राय 80.77 टक्के आला आहे.

तसेच वाणिज्य शाखेमध्ये विद्यालयातून 72 विद्यार्थी बसलेले असून त्यातील 18 विद्यार्थ्यांना विशेष प्राविण्या मिळाले आहे. तर प्रथम श्रेणीत 38 विद्यार्थी, द्वितीय श्रेणीस 14 विद्यार्थी तर पास श्रेणीत दोन विद्यार्थी आहेत. यामध्ये टिशा अशोक श्रीयन 92 टक्के, द्वितीय सचिन मुकेश पाटील 88.77 टक्के, तृतीय नीलू उमाशंकर यादव 88.15 टक्के आला आहे.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, कार्यकारिणी सदस्य आमदार प्रशांत ठाकूर, सचिव डॉ. गडदे सर, प्राचार्य तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply