मुंबई ः प्रतिनिधी
राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून सरकारमध्ये समाविष्ट असलेल्या तिन्ही पक्षांत अनेक अंतर्गत मदभेद असल्याचे वारंवार समोर आले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांत हे तिन्ही पक्ष एकत्र असतील का, असा प्रश्न राज्यातील जनतेला पडला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या निष्क्रिय कारभाराविरोधात प्रमुख विरोधी पक्ष भाजपने वेळोवेळी रान उठविले आहे. त्यातच आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.
या वेळी बोलताना काँग्रेस राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व विधानसभा निवडणुका स्वबळावर लढेल, असे नाना पटोले यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आघाडीत बिघाडी होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. राज्यात अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर आघाडी सरकारमध्ये मतभेद आहेत. पदोन्नतीतील आरक्षणाच्या मुद्द्यावरही महाविकास आघाडी सरकारमध्ये मोठा वाद सुरू असल्याची माहिती समोर आली होती. यावरून मविआ सरकारमधून काँग्रेस बाहेर पडण्याच्या तयारीत असल्याचेही बोलले जात होते. त्यामुळे नाना पटोले यांच्या ह्या खळबळजनक विधानाने राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू आहे.
Check Also
पत्रकार उत्कर्ष समितीतर्फे लोकनेते रामशेठ ठाकूर यांना ‘जीवन गौरव’ प्रदान
पनवेल : रामप्रहर वृत्तजनसेवेच्या महान यज्ञामध्ये उल्लेखनीय योगदान देत भावी पिढीला प्रेरणा देणारे माजी खासदार, …
RamPrahar – The Panvel Daily Paper