पनवेल : रामप्रहर वृत्त
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे झुंझार नेते स्व. दि. बा. पाटील यांचेच नाव द्यावे, असा ठराव गव्हाण ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे. या ठरावाची प्रत ग्रामपंचायतीच्या वतीने लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीचे कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांना देण्यात आली.
या वेळी भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, सरपंच हेमलता भगत, उपसरपंच सचिन घरत, सदस्य विजय घरत, हेमंत पाटील, योगिता भगत, कामिनी कोळी, उषा देशमुख उपस्थित होते. लोकनेते दि. बा. पाटील यांनी शेतकरी व कष्टकर्यांच्या न्याय हक्कासाठी अनेक लढे यशस्वी केले आहेत. त्यामुळे विमानतळाला ‘दिबां’चेच नाव द्यावे, असे दिलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
Check Also
खोपोली येथील विविध समाज घटकांतील कार्यकर्ते भाजपमध्ये
आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती खोपोली : प्रतिनिधीभाजपचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस तथा पनवेलचे कार्यसम्राट …
RamPrahar – The Panvel Daily Paper