Breaking News

जि. प.च्या शिक्षकांसाठी फोनिक्स ऑनलाइन प्रशिक्षणाचा शुभारंभ

कर्जत : बातमीदार

तालुक्यातील शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या इंग्रजी विषयाच्या प्रगतीसाठी नवनवीन उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शिक्षकांसाठी तालुका पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी संतोष दौंड यांनी फोनिक्स ऑनलाइन प्रशिक्षण वर्ग सुरू केले आहेत. गेले दीड वर्ष रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा बंद शिक्षण सुरू या तत्त्वाने ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. शिक्षक समृद्ध असतील तर विद्यार्थ्यांना ज्ञानदान करताना फारशा अडचणी येत नाहीत, हा उद्देश समोर ठेवून कर्जत शिक्षण विभागाने विविध उपक्रम राबविण्यावर भर दिला आहे. त्यातून अनेक उपक्रम राबविणारे कर्जत मंडल हे राज्यात आघाडीवर असून सध्या कर्जत तालुका 15व्या क्रमांकावरून राज्यात चौथ्या क्रमांकावर आला आहे. राज्य लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून गटशिक्षणाधिकारी म्हणून रुजू झालेले संतोष दौंड यांनी तालुक्यातील शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचे ठरविले आहे. शिक्षक प्रगत असेल तर मग विद्यार्थी आपोआप उच्चशिक्षित होईल या उद्देशाने गटशिक्षणाधिकारी यांनी या उपक्रमाला सुरुवात केली आहे. गटशिक्षणाधिकारी संतोष दौड यांनी गजानन विद्यालय कडाव येथे इंग्रजी विषयाचे अध्यापन करणारे तसेच ब्रिटिश कौन्सिलच्या चेस उपक्रमात राज्यस्तरावर मार्गदर्शन करणारे शिक्षक भूपेंद्र महाजन यांच्याकडे तालुक्यातील स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालय जंभिवली-गौरकामथ यांच्या खांद्यावर तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून जबाबदारी दिली. त्यांनी घेतलेल्या प्रशिक्षण सत्रास जिल्हा परिषद शाळेत शिक्षण देणार्‍या  शिक्षकांनी लॉकडाऊनचे कारण पुढे न करता उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या प्रशिक्षण वर्गातील शिक्षकांचा सहभाग यामुळे तब्बल चार बॅचेस तयार करण्यात आल्या आहेत.आपण जे ध्वनी उच्चार करतो त्याचा उच्चार करण्याच्या विशिष्ट प्रकारच्या पद्धती आहेत.काही शब्द उच्चारताना नाक, जीभ, टाळू यांचा वापर होतो आणि ध्वनी निर्माण होतात. यालाच इंग्रजीत फोनिक्स असे म्हणतात. या शब्दांचा योग्य उच्चार करण्याची पद्धती माहीत असेल तर इंग्रजी उच्चारणात चुका होणार नाहीत. त्यातून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना अचूक मार्गदर्शन केले तर सरावाने विद्यार्थी अचूक उच्चार करतील व इंग्रजी विषय हा अतिशय सोपा होईल. ही धारणा तयार होऊन इंग्रजी विषयाचा जो बाऊ केला जातो तो कमी होऊन जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी आत्मविश्वासाने इंग्रजी शिकतील हा या प्रशिक्षणाचा उद्देश आहे. हा उद्देश निश्चितच सफल होईल, असा आशावाद गटशिक्षणाधिकारी संतोष दौंड यांना आहे. यासाठी शिक्षकांची सर्व माहिती संकलित करून फॉर्म भरून घेण्यापासून त्यांची विभागणी वेगवेगळ्या गटात करण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी तांत्रिक कामकाज करण्यासाठी नांदगाव केंद्रातील हरहुन्नरी, तंत्रस्नेही, अभ्यासू शिक्षक स्वप्नील पितळे हे जबाबदारी पार पाडत आहेत.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply