पनवेल ः रामप्रहर वृत्त
जागतिक योग दिनानिमित्त कोशिश फाऊंडेशनच्या वतीने शास्त्रशुद्ध-लयबद्ध सूर्यनमस्कार स्पर्धा 2021चे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा पनवेल महानगरपालिका क्षेत्रासाठी मर्यादित आहे.
आठ गटांमध्ये होणार्या या स्पर्धेतील प्रत्येक गटातील प्रथम क्रमांकास 5555 रुपये, द्वितीय 3333 हजार रुपये, तृतीय 2222 रुपये तसेच दोन उत्तेजनार्थ प्रत्येकी 1111 रुपये त्याचबरोबर सन्मानचिन्ह अशी एकूण विजेत्यांना एक लाख रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकाने सूर्यनमस्काराचा व्हिडीओ रेकॉर्ड करून 15 जूनपर्यंत रिीशीहींहरर्ज्ञीी.ळप या संकेतस्थळावर पाठवणे आवश्यक आहे. विजयी स्पर्धकांची नावे 21 जूनला म्हणजेच जागतिक योग दिनी जाहीर करण्यात येतील.
या स्पर्धेचा जास्तीत जास्त योगप्रेमींनी लाभ घ्यावा तसेच अधिक माहितीसाठी 7757000000 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन कोशिश फाऊंडेशनचे अध्यक्ष व पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी केले आहे.
Check Also
कर्जतमधील रायगड जिल्हा बँकेची शाखा जळून खाक
कर्जत : प्रतिनिधी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेला रविवारी (दि. 5) पहाटेच्या सुमारास आग …