भाजपच्या बैठकांना उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल ः रामप्रहर वृत्त
विधानसभा निवडणुकीसंदर्भात भाजप पनवेल तालुका मंडलच्या वतीने ठिकठिकाणी बैठका होत असून या बैठकींना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.
पनवेल विधानसभा मतदारसंघात चिंध्रण, नेरे, आदई, सुकापूर, विचुंबे, खारघर, पडघे, तळोजे मजकूर, बेलवली आदी ठिकाणी बैठका झाल्या. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, तसेच पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकांना उदंड प्रतिसाद लाभला.
सिडकोचे तसेच भाजपचे जिल्हा अध्यक्ष व कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांनी मतदारसंघात केलेली विकासकामे आणि त्यांच्या कार्याचा झंझावात राज्यभर पसरला आहे. जनतेच्या विकासासाठी अहोरात्र मेहनत घेण्याचे काम त्यांच्याकडून सातत्याने होत असल्याने त्यांच्या कार्याचा गौरव सतत पाहायला मिळतो. शहरांसोबत ग्रामीण भागातही मिळणारा प्रतिसाद पाहता एक लाखापेक्षा जास्त मताधिक्याने विजयी होत आमदार प्रशांत ठाकूर हॅट्ट्रिक करणार आहे, त्या अनुषंगाने लोकप्रतिनिधी,
पदाधिकारी, कार्यकर्ते सज्ज झाले आहेत. या बैठकीच्या माध्यमातून भाजप सरकारने केलेली विकासकामे पोहोचविण्याचे आवाहनही या बैठकीतून करण्यात आले आहे.