पनवेल ः वार्ताहर
लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त कळंबोली सेक्टर 17 येथे दैवत टॅक्सी स्टँड या नावाने टॅक्सीसेवा चालू करण्यात आली आहे. या स्टँडचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (दि. 8) झाले. उद्घाटन समारंभास भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, सरचिटणीस नितीन पाटील, कळंबोली शहराध्यक्ष अमर पाटील, माजी शहराध्यक्ष रविनाथ पाटील, भटके विमुक्त आघाडीचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष बबन बारगजे, माजी नगरसेवक बबन मुकादम, राजू शर्मा, रवींद्र भगत, प्रमिला पाटील, माजी जि.प. सभापती प्रिया मुकादम, वाहतूक संघटनेचे प्रभूदास भोईर, अमर ठाकूर, विजय भोईर, टॅक्सी स्टँडचे संस्थापक महेश बारगजे व त्यांचे सहकारी उपस्थित होते.
कळंबोलीतील नागरिकांना मुंबई, नवी मुंबई, रायगड आणि इतर ठिकाणी जाण्यासाठी ही टॅक्सीसेवा चालू करण्यात आली आहे. या सुविधेचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन बबन बारगजे यांनी केले आहे.
Check Also
महात्मा फुले जनआरोग्य योजनेत आमूलाग्र बदलांचे संकेत
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्याला मोठे यश! संपूर्ण महाराष्ट्रातील रुग्णांना होणार फायदा मुंबई : रामप्रहर …
RamPrahar – The Panvel Daily Paper