Breaking News

पेट्रोलियममंत्र्यांचा राहुल गांधींवर पलटवार

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पेट्रोलच्या दरवाढीवरून केंद्रावर केलेल्या टीकेवर केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी त्यांच्यावर पलटवार केला आहे. महाराष्ट्रात देशात सर्वाधिक पेट्रोलचे दर आहेत. येथे काँग्रेस सत्तेत आहे. त्यामुळे राहुल गांधींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पेट्रोलचे दर कमी करण्यास सांगावे, असे केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटले आहे. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी केंद्र सरकारची भूमिका स्पष्ट केली.
देशात इंधनाचे दर वाढतच आहेत. त्यावर भाजप सरकार लगाम लावू शकली नाही, याबाबत उत्तर देताना प्रधान म्हणाले की, राहुल गांधींनी अशा प्रकारची बेजबाबदार विधाने करू नयेत. पहिल्यांदा त्यांनी याचे उत्तर द्यावे की, काँग्रेसशासित राज्यांमध्ये जसे पंजाब, राजस्थान आणि महाराष्ट्रात पेट्रोलचे दर जास्त का आहेत? जर राहुल गांधी यांना गरिबांचा इतकाच कळवळा असेल, तर त्यांनी ज्या महाराष्ट्रात देशात सर्वाधिक पेट्रोलचे दर आहेत, तेथील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पेट्रोलवरील कर कमी करण्याच्या सूचना कराव्यात.

Check Also

सीकेटी विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) …

Leave a Reply