Breaking News

कोरोनाबाधितांच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे करंजाडे वसाहतीत अँटीजेन चाचण्या

पनवेल : वार्ताहर

करंजाडे वसाहतीत दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने करंजाडे वसाहतीमध्ये कोरोना तपासणी सुरू करण्यासंदर्भात व वसाहतीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याकरिता काय उपाययोजना करता येईल याबाबत भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी तहसीलदार विजय तळेकर, विभागीय अध्यक्ष समीर केणी, करंजाडे सरपंच रामेश्वर आंग्रे यांच्यासमवेत सिडकोचे आरोग्य अधिकारी डॉ. बी. एस. बाविस्कर यांच्याबरोबर चर्चा केली होती. त्यानुसार मंगळवारी (दि. 22) सिडकोद्वारे रा. जि. प. शाळा चिंचपाडा सेक्टर आर 2 पुष्पक नोडमध्ये बाधितांची अँटीजेन तपासणी सुरू केली आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शासन स्तरावर विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. पनवेल महापालिका व ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यातच सिडकोद्वारे नव्याने विकसित केलेल्या करंजाडे वसाहतीमध्ये एक लाख लोकसंख्या असलेल्या या वसाहतीमध्येदेखील बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. करंजाडे वसाहतीतील लक्षणे असलेल्या बाधितांना तपासणी किंवा लसीकरण करण्याकरिता थेट पनवेल गाठावे लागत आहे. त्यामुळे वसाहतीतील नागरिकांना गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. त्याचबरोबर करंजाडे वसाहतीमध्ये सेक्टर 1 ते 6, तसेच आर-1 ते आर-5 येथील सिडको आरोग्य विभागाच्या माहितीनुसार गेल्या वर्षभरामध्ये 1994 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यामध्ये 1927 जणांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले होते. त्याचबरोबर एकूण 34 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद सिडको आरोग्य विभागाकडे नोंदविण्यात आली होती, तसेच दर दिवसाला सुमारे 25 ते 30 कोरोना पॉझिटिव्ह आढळून येत आहेत. त्याचबरोबर रविवारी 26 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत, तर 21 रोजी 17 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर, तहसीलदार विजय तळेकर, विभागीय अध्यक्ष समीर केणी यांनी सिडकोचे आरोग्य अधिकारी डॉ. बी. एस. बाविस्कर यांच्यासह अधिकारी व डॉक्टर यांच्याशी चर्चा केली होती, तसेच कोरोनाबाधितांची संख्या कमी करण्याच्या दृष्टीने काय उपाययोजना करता येतील याबाबत चर्चा केली होती. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी येथील नागरिकांनी याच ठिकाणी सिडकोकडून अँटीजेन तपासणी व लसीकरण तसेच कॉन्टॅक्ट ट्रेसिंग या गोष्टी केल्या तरच संख्या कमी होईल, असे बाविस्कर यांना सांगितले होते. त्यानुसार बाविस्कर यांनी या विषयाची दखल घेत वसाहतीमध्ये मंगळवारपासून कोरोना अँटीजेन तपासणी सुरू केली आहे. या वेळी करंजाडे वसाहतीमध्ये सिडकोचे डॉ. इशान शेवाळे हे मेहनत घेत आहेत.

आमदार प्रशांत ठाकूर यांचा पाठपुरावा

करंजाडे वसाहतीमध्ये कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे आमदार प्रशांत ठाकूर यांनी वसाहतीमध्ये सिडकोच्या माध्यमातून लसीकरण व अँटीजेन तपासणी लवकरात लवकर सुरू करावी यासाठी सिडको विभागाकडे वारंवार मागणी व पाठपुरावा केला. त्यामुळे करंजाडे वसाहतीमध्ये कोविड अँटीजेन तपासणी सुरू झाली आहे.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply