नवी दिल्ली : राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए)च्या वतीने गुरुवारी (दि. 1) आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील डॉक्टर समुदायाला संबोधित केले. गेल्या दीड वर्षात डॉक्टरांनी समाजासमोर एक आदर्श ठेवला असून देवदूत बनून आपले प्राण वाचवले आहेत. त्यांना सलाम, अशा शब्दांत त्यांचे पंतप्रधान मोदींनी कौतुक केले. पंतप्रधान मोदींनी पुढे बोलताना सांगितले की, देशात एम्सची संख्या वाढविली जात आहे. त्यासोबत वैद्यकीय व्यवस्थाही सुधारली जात आहे. या वर्षी आरोग्य क्षेत्राचे बजेट दुप्पट करण्यात आले आहे. राष्ट्रीय डॉक्टर दिन दरवर्षी 1 जुलै रोजी देशभरात साजरा केला जातो. हा दिवस देशातील महान डॉक्टर आणि पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री बिधानचंद्र रॉय यांचा वाढदिवस आणि पुण्यतिथी आहे. त्यांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो.
Check Also
कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये
पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …