Breaking News

विविध मागण्यांसंदर्भात ‘बीएमएस’चे केंद्रीय नौकानयनमंत्र्यांना निवेदन

पुणे : प्रतिनिधी

केंद्रीय नौकानयनमंत्री मनसुख मांडविया यांचा शुक्रवारी (दि. 1) सीरम इन्स्टिट्युट येथे भेट देण्यासाठी दौरा होता. या दरम्यान त्यांना देशातील विविध पोर्टमधील परमनंट व कंत्राटी कामगारांनी कोविड काळात काम केलेल्या कामगारांना कोविड भत्ता मिळावा व कामगारांची पगारवाढ लवकरात लवकर करावी, अशी मागणी बीएमएस पोर्ट महासंघाच्या वतीने करण्यात आली.

या मागणीसंदर्भात पुणे येथे बीएमएस पोर्ट महासंघाच्या राष्ट्रीय नेत्यांनी केंद्रीय नौकानयन मंत्री मनसुख मांडविया यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली  व त्यांना निवेदन दिले. या वेळी मुंबईचे खासदार मनोज कोटक, बीएमएसचे राष्ट्रीय नेते आण्णा धुमाळ, बीएमएस पोर्ट महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस सुरेश पाटील आदी उपस्थित होते.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply