Breaking News

पंतप्रधान मोदी उद्या साधणार शेतकर्‍यांशी संवाद

नवी दिल्ली : देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकर्‍यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. या वेळी ते अयोध्येतील शेतकर्‍यांना कृषी कायद्यांतील वैशिष्ट्ये समजावून सांगणार आहेत. त्यानंतर उत्तर प्रदेशातील भाजप कार्यकर्ते हे कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांचे पत्र घरोघरी पोहचवणार आहेत. अटलजींच्या जयंती दिनी अयोध्येत एकूण 377 ठिकाणी, तर संपूर्ण उत्तर प्रदेशात सुमारे अडीच हजार ठिकाणी शेतकर्‍यांना जोडले जाण्याच्या प्रक्रियेसाठी कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकर्‍यांशी संवाद साधणार असून, कृषी कायद्यांचे महत्त्व शेतकर्‍यांना सांगणार आहेत. या वेळी किसान सन्मान निधीही वितरित केला जाणार आहे. या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू आहे.

Check Also

मुंबईजवळ समुद्रात बोट बुडून 13 जणांचा मृत्यू; 101 जणांना वाचवले

मुंबई : प्रतिनिधी मुंबईमधून एलिफंटाकडे जाणारी एक प्रवासी बोट बुधवारी (दि.18) सायंकाळी बुडाल्याची दुर्घटना घडली. …

Leave a Reply