Breaking News

रसायनीतील सचिन म्हशीलकरचा मॅरेथॉन स्पर्धेत ‘डबल धमाका’

सुवर्ण व रौप्यपदक जिंकले

मोहोपाडा : प्रतिनिधी
रिस येथील सचिन घनश्याम म्हशीलकर याने छत्तीसगडमधील रायपूर येथे झालेल्या 32व्या ज्युनियर वेस्ट झोन नॅशनल अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत मॅरेथॉन प्रकारात सुवर्ण व रौप्य अशी दोन पदके पटकाविली. फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने आयोजित या स्पर्धेत सचिनने महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करीत स्वत:सह रसायनी परिसराचे नाव उज्ज्वल केले आहे.
सचिन म्हशीलकर याने मॅरेथॉनच्या 400 मीटर गटात  सुवर्णपदक आणि 200 मीटर गटात रौप्यपदक जिंकले. तो नवी मुंबईतील मॅरेथॉनचे राष्ट्रीय कोच रोहित कनोजिया यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. याआधीही सचिनने विविध पारितोषिके पटकावली आहेत. राष्ट्रीय स्पर्धेत दोन पदके जिंकल्याबद्दल त्याचे कौतुक व अभिनंदन होत आहे.

Check Also

दिवाळी अंकांतून साहित्य क्षेत्राला नवी उंची -मंत्री आशिष शेलार

रौप्य महोत्सवी स्पर्धेचे पारितोषिक वितरण पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले …

Leave a Reply