Breaking News

वाढीव घरपट्टी रद्द करा; अन्यथा खोपोली भाजपचा आंदोलनाचा इशारा

खोपोली ः प्रतिनिधी

येथील नगरपालिकेने आर्थिक वर्षात जी वाढीव घरपट्टी आकारली ती अन्यायकारक आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने ती रद्द करावी, अशा मागणीचे निवेदन शहर भाजपच्या वतीने अध्यक्ष इंदरमल खंडेलवाल यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्याधिकारी गणेश शेटे यांना सोमवारी (दि. 12) दिले. मागील दोन वर्षांपासून कोविड महामारी तसेच लॉकडाऊनमुळे उद्योगधंदे बंद आहेत. हजारो कामगार बेरोजगार झाले आहेत. त्यात व्यापाराचेही मोठे नुकसान झाले आहे. असे असताना केंद्र शासन एक बाजूला आर्थिक मदतीचा हात देत असताना पालिकेने मात्र घरपट्टी वाढविली. याबाबत नगरसेवकांनी कुठलाही ठराव पास केला नाही. वाढत्या घरपट्टीच्या संकटाने सर्वसामान्य माणूस कोसळणार आहे. त्यासाठी वाढीव घरपट्टी तत्काळ रद्द करावी, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या वेळी शहराध्यक्ष इंदरमल खंडेलवाल, महिला अध्यक्ष शोभा काटे, शहर सरचिटणीस हेमंत नांदे, कोषाध्यक्ष राकेश दबके, कामगार आघाडीचे सूर्यकांत देशमुख, सुनील नांदे, अजय इंगुळकर, दिलीप निंबाळकर आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply