Breaking News

अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

ठाणे ः प्रतिनिधी :अवघा देश निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त असताना मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या विरार परिसरात इयत्ता 9वीत शिकणार्‍या मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. ही 15 वर्षीय पीडित मुलगी घटना घडली तेव्हा आपल्या मित्रासोबत होती. दोघे निर्जन स्थळी पोहचल्याचे हेरून दोन लोकांनी तिच्या मित्रासह मुलीला झाडाला बांधले आणि तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. ही घटना सोमवारी रात्री घडली आहे. दोन आरोपींपैकी एक जण ऑटोरिक्षा चालक असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

पीडित मुलीच्या वडिलांनी बुधवारी विरार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार ही घटना सोमवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास घडली. त्यावेळी पीडित मुलगी आपल्या नातेवाइकांच्या घरी जात होती. त्यावेळी रस्त्यात तिचा शाळेतील मित्र तिला भेटला. त्यावेळी तिथे दोन लोक आले. त्यापैकी एक जाड, तर दुसरा किरकोळ बांध्याचा होता. दोघांनी त्यांना शाळेच्या मागील परिसरात एका उजाड जागेवर खेचत नेले.

 जीवे मारण्याची धमकी

पीडित मुलीचा मित्र किशोर याने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार दोघांनी किशोरला एका झाडाला बांधले आणि आरडाओरडा केल्यास ठार मारण्यात येईल, अशी धमकी दिली. त्यानंतर दोघांनी पीडित मुलीला झाडामागे नेले आणि तिथे तिच्यावर बलात्कार केला.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply