पनवेल ः रामप्रहर वृत्त
टिंगटाँग ऑनलाइन 14 वर्षाखालील अखिल भारतीय बुद्धीबळ स्पर्धेत पनवेलचा पारस भोईर याने प्रथम क्रमांक पटकाविला. पारसने साखळी नऊ फेर्यांमध्ये सर्वाधिक 8.5 गुण घेत निर्विवाद वर्चस्व मिळविले.
महाराष्ट्रासह तामिळनाडू, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, तेलंगाना, दिल्ली, पंजाबच्या सबज्युनियर खेळाडूंनी उत्तम चाली रचून स्पर्धेमध्ये रंगत निर्माण केली. आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी, आत्माराम मोरे प्रतिष्ठान, स्वराज्य फौंडेशन, आरएमएमएस आणि इन्स्टिट्यूट फॉर चेस एक्सलंट यांच्या संयुक्त विध्यमाने भारताच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त 14 वर्षाखालील शालेय मुला-मुलींसाठी ऑनलाइन चार बुद्धीबळ स्पर्धांची विनाशुल्क मालिका आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ दिनापासून सुरू करण्यात आली आहे.
मुंबई शहर जिल्हा बुद्धीबळ संघटना सहकार्यीत पहिल्या टिंगटाँग ऑनलाइन बुद्धीबळ स्पर्धेत पारस भोईरने प्रथम, नागपूरच्या श्रद्धा बजाजने (7 गुण) द्वितीय, पनवेलच्या जयराज निवातेने (6.5 गुण) तृतीय, चेन्नईच्या डी.पी.अभिनवने (6.5 गुण) चौथा, मुंबईच्या आर्य राठोडने (6.5 गुण) पाचवा, तामिळनाडूच्या ए. विश्वाने (6.5 गुण) सहावा, लुधियानाच्या सेहज प्रीत कौरने (6 गुण) सातवा, पुण्याच्या अक्षय जोगळेकरने (6 गुण) आठवा, मध्य प्रदेशच्या वैभव नेमाने (5.5 गुण) नववा तर गाझियाबादच्या एकांश गोयलने (5.5 गुण) दहाव्या क्रमांकाचा रोख पुरस्कार जिंकला.
टॉप-10 विजेत्यांना 14 व 15 ऑगस्ट रोजी होणार्या शालिनीताई भालेकर स्मृती चषक चॅम्पियन ऑफ चॅम्पियनस स्पर्धेसाठी थेट प्रवेश दिला जाणार आहे. शालेय बुद्धीबळ मालिकेतील दुसरी आत्माराम मोरे स्मृती चषक विनाशुल्क ऑनलाइन बुद्धीबळ स्पर्धा 1 ऑगस्ट रोजी टॉप-10 पुरस्कारांसाठी होणार आहे.
संघटन समितीचे पदाधिकारी गोविंदराव मोहिते, अश्विनीकुमार मोरे, उदय पवार, अनंत भालेकर, लीलाधर चव्हाण व अरेना मास्टर बुध्दिबळपटू राजाबाबू गजेंगी यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले.
Check Also
सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान
सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …