Breaking News

धोकादायक ट्रान्सफॉर्मरचे खांब बदलले

माजी उपमहापौर विक्रांत पाटील यांचा पाठपुरावा

पनवेल : रामप्रहर वृत्त

धोकादायक झालेले ट्रान्सफॉर्मरचे खांब माजी उपमहापौर विक्रांत पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे महावितरणकडून त्वरित बदलण्यात आले.

पयोनियर विभाग संघमित्रा सोसायटीजवळ असलेल्या ट्रान्सफॉर्मरचे खांब कुचकामी झाले होते आणि ते कोणत्याही क्षणी पडून एखादी दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झाली होती. ही गंभीर बाब कार्यक्षम नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या लक्षात येताच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तत्काळ महावितरणच्या अधिकार्‍यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. त्यानंतर मोडकळीस आलेले खांब त्वरित बदली करण्यात यावे यासाठी पत्रसुद्धा दिले. सततच्या पाठपुराव्यामुळे अखेर महावितरणच्या वतीने हे दोन्ही मोडकळीस आलेले खांब बदली करण्यात आले. आपल्या प्रभागाच्या समस्या सोडवण्यासाठी नगरसेवक विक्रांत पाटील नेहमी तत्पर असतात याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply