Breaking News

टोकियो ऑलिम्पिक : भारताची बॉक्सर लोव्हलिना उपांत्यपूर्व फेरीत; पदकापासून एक विजय दूर

टोकियो ः वृत्तसंस्था

भारताची लोव्हलिना बोरगोहेन उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरली आहे. 64-69 किलोग्राम वजन गटात तिने जर्मन बॉक्सरला 3-2ने पराभूत केले. लव्हलिना ही पदकापासून फक्त एक विजय दूर आहे. एकदा उपांत्य फेरी गाठल्यानंतर तिचे किमान कांस्यपदक निश्चित होईल. उपांत्यपूर्व सामना 30 जुलै रोजी होईल. लोव्हलिनाने संपूर्ण सामन्यात तिच्यापेक्षा अधिक अनुभवी बॉक्सरशी स्पर्धा केली आणि अखेर हा सामना जिंकण्यात ती यशस्वी झाली. पहिल्या दोन फेर्‍यांमध्ये लोव्हलिनाने शानदार खेळी केली. तिसर्‍या फेरीत जर्मन बॉक्सरने पुनरागमन केले, पण शेवटी भारताच्या बॉक्सर लोव्हलिनने बाजी मारली. भारतीय महिला बॉक्सर लोव्हलिनाची ही पहिली ऑलिम्पिक आहे. आपल्या पहिल्याच ऑलिम्पिक सामन्यात तिने चमकदार कामगिरी करून पदकाची आशा निर्माण केली आहे. बॉक्सर लोव्हलिनाशिवाय बॉक्सिंगसाठी भारताची पदकांची आशा असलेल्या एमसी मेरी कोमनेही विजयासह टोकियोमध्ये आपल्या मोहिमेची सुरुवात केली आहे. मेरीने हर्नांडेझ गार्सियाविरुद्ध 32 सामन्यांची फेरी जिंकून पदकाच्या आशा निर्माण केल्या आहेत. उपांत्य फेरी गाठल्यानंतर तिचे किमान कांस्यपदक निश्चित होईल.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply