Breaking News

इंग्लंडच्या खेळाडूला भर मैदानातून अटक; सेक्स चॅट भोवले

लंडन ः वृत्तसंस्था

इंग्लंडमधील 29 वर्षीय क्रिकेटपटू डेव्हिड हाइमर्स याला पोलिसांनी नुकतीच अटक केली आणि तीसुद्धा क्रिकेट सामना सुरू असणार्‍या मैदानामधून. क्लब क्रिकेटर म्हणून स्थानिक पातळीवर लोकप्रिय असणार्‍या डेव्हिडवर अल्पवयीन मुलींना अश्लील मेसेज पाठवल्याचा आरोप आहे. डेव्हिड हा शाळकरी मुलींना अश्लील मेसेज पाठवायचा अशी तक्रार पोलिसांकडे करण्यात आली होती. त्यानंतर ही अटकेची कारवाई करण्यात आली. ‘द मिरर’मधील वृत्तानुसार डेव्हिडचा पर्दाफाश करण्यासाठी गार्डियन्स ऑफ द नॉर्थ नावाच्या एका ग्रुपने सोशल मीडियावर एका अल्पवयीन मुलीच्या नावाने बनावट अकाऊंट ओपन केले. या अकाऊंटवर डेव्हिड सतत अश्लील मेसेज पाठवायचा. डेव्हिड अशा प्रकारे अश्लील मेसेज प्रकरणी कायद्याच्या कचाट्यात सापडण्याची ही पहिलीच वेळ नाहीय. यापूर्वीही त्याने असे प्रकार केले आहेत. मागील वेळेस त्याला पोलिसांनी इशारा देऊन सोडून दिले होते, मात्र आता त्याला अटक करण्यात आली आहे. डेव्हिडने पोलिसांकडे जबाब नोंदवला असून त्यात त्याने आपण मुलींसोबत सेक्स चॅट करायचो हे मान्य केले आहे. अगदी 13-14 वर्षांच्या मुलींसोबतही तो सेक्स चॅट करायचा. मुलींसोबत अशा पद्धतीच्या गप्पा मारता याव्यात म्हणून त्याने सोशल नेटवर्किंगवर आपले नावही बदलले होते. दरम्यान, डेव्हिडला या प्रकरणामध्ये अटक करण्यात आल्यानंतर इंग्लंड क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच ईसीबीनेही त्याच्यावर मोठी कारवाई करीत त्याला अनिश्चित काळासाठी निलंबित केले आहे.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply