Breaking News

कामोठे भाजपकडून पूरग्रस्तांना साहित्य रवाना

कामोठे : रामप्रहर वृत्त

कामोठे भारतीय जनता पक्षातर्फे पूरग्रस्तांसाठी महाडकडे बुधवारी (दि. 28) मदत रवाना करण्यात आली. या वेळी नगरसेवक विजय चिपळेकर, भाजप ओबीसी जिल्हा सरचिटणीस राजेश गायकर, पनवेल बार कौन्सिलचे ऑडिटर अ‍ॅड. धनराज तोकडे, समाजसेवक केशव घरत, निवृत्त सेल्स टॅक्स अधिकारी सुहास पाटील आदी उपस्थित होते.

महाड पूरग्रस्तांकरिता कामोठेवासीयांसह भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष केके म्हात्रे, नगरसेवक विजय चिपळेकर, तालुकाध्यक्ष रवी जोशी, डॉ. अरुणकुमार भगत, जिल्हा सरचिटणीस राजेश गायकर, दिलीप पाटील, संदीप तुपे, अ‍ॅड. धनराज तोकडे, केशव घरत, प्रकाश पाटील, जय शिंदे, रजनी गायकवाड, विनोद खेडकर, संदीप चव्हाण, सुहास पाटील आदींनी मदत दिली. बासमती तांदूळ, पीठ, मैदा, तूरडाळ, केळ्याचे वेफर्स, बिस्किट, तेल, कोलगेट, मेणबत्ती, माचिस, साबण, औषधे, पाणी, ब्लॅकेंट, कपडे या स्वरूपात मदत महाडकरांना देण्यात आली.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply