Breaking News

सर्वांगसुंदर शिव-स्मारक उभारणीबद्दल महेश बालदी यांचे अभिनंदन

उरण : रामप्रहर वृत्त

जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी यांच्या अथक प्रयत्नांतून व संकल्पनेतून साकार झालेल्या आणि कोटी अनुयायी असलेल्या ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, अनंत गीते, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिव-समर्थ स्मारकाचे रविवारी (दि. 17) उद्घाटन झाले. याबद्दल उरण तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने या कामगिरीबद्दल जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी यांचे अभिनंदन करण्यात आले. शिवरायांचे व समर्थांचे शिव-समर्थ स्मारक उभे राहू नये याकरिता अनेक राहू-केतूंनी प्रयत्न केले. अनेक अडथळा आणण्याचे काम केले. या सर्वांवर मात करीत शिवप्रेरणेने प्रेरित झालेल्या महेश बालदी यांनी कार्य तडीस नेले. त्याबद्दल सर्वस्तरांतून बालदी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. उरण भाजपतर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात आले. या वेळी भाजप तालुकाध्यक्ष रवी भोईर, वाहतूक संघटना जिल्हाध्यक्ष सुधीर घरत, सरचिटणीस दीपक भोईर, शहराध्यक्ष कौशिक शहा, चिटणीस सुनील पाटील, उपनगराध्यक्ष जयविंद्र कोळी, नगरसेवक राजेश ठाकूर, प्रदीप नाखवा, नितीन पाटील, राजेश नाखवा, परशुराम म्हात्रे, सनी म्हात्रे, राजेश कोळी, मदन कोळी उपस्थित होते.

Check Also

एक दिग्दर्शक, एक वर्ष, चार चित्रपट, सर्वच सुपर हिट; मनमोहन देसाईंची कम्माल…

दिग्दर्शक मनमोहन देसाईंच्या चित्रपटात इतकं आवडण्यासारखे काय असते? माहीत नाही. याचा अर्थ त्याबाबत अज्ञान आहे …

Leave a Reply