Breaking News

भारताची कुस्तीपटू विनेश फोगट पराभूत

टोकियो ः वृत्तसंस्था

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगटने स्वीडनच्या सोफिया मेडालेना धोबीपछाड देत 53 किलो वजनी फ्री स्टाइल कुस्ती स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. त्यानंतर काही वेळाने झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत मात्र विनेशला पराभवाला सामोरे जावे लागले. कुस्तीपटू विनेश फोगटने 53 किलो वजनी गटातील फ्री स्टाईल कुस्ती प्रकारात स्वीडनच्या सोफिया मेडालेनाचा पराभव करीत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता. सोफिया मेडालेनाचा 7-1 अशा फरकाने पराभव केल्याने विनेश उपांत्यपूर्व फेरीतही याच कामगिरीची पुनरावृत्ती करेल अशी आशा होती, मात्र तिला पराभवाचा सामना करावा लागला. उपांत्यपूर्व फेरीत विनेश फोगटची लढत बेलारूसची कुस्तीपटू वेन्स कलाडझिंस्कायासोबत झाली. सामन्याच्या सुरुवातीला वेन्सने आघाडी घेतली. त्यामुळे विनेश फोगट 2-5ने पिछाडीवर पडली. कोलडाझिंस्कायाने आघाडी कायम ठेवत विनेशचा 9-3ने पराभव केला.

...तर विनेशला पदकाची संधी

कुस्तीपटू विनेश फोगटचा पराभव झाल्यानंतर कुस्तीप्रेमी नाराजी झाले. तिच्याकडून असलेल्या पदकाच्या अपेक्षा मावळल्या, मात्र असे असले तरीही विनेश फोगटला पदक मिळू शकते. हे होण्यासाठी प्रतिस्पर्धी खेळाडून वेन्स कलाडझिंस्काया अंतिम फेरीत प्रवेश करणे आवश्यक आहे. वेन्स अंतिम फेरीत दाखल झाल्यास विनेशला रॅपिचाज राऊंडनुसार पदकासाठी खेळण्याची संधी मिळू शकते.

Check Also

भव्य कटआऊट्स; चित्रपटाचं मोठेपण त्यातही

आज सगळीकडेच लक्ष्मण उत्तेकर दिग्दर्शित ‘छावा’ची जबरदस्त क्रेझ आहे. चित्रपट शौकिनांपासून इतिहासाचे अभ्यासक आपापल्या पद्धतीनुसार …

Leave a Reply