Breaking News

खाघरमध्ये रक्तदान शिबिरास प्रतिसाद

पनवेल ः रामप्रहर वृत्त

पनवेल विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्या अंतर्गत प्रभाग समिती अ सभापती अनिता पाटील यांच्या माध्यामातून शनिवारी (दि. 7) खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या उपक्रमाला भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट दिली.

कोरोना वैश्विक महामारीच्या काळात रक्ताचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी पनवेल महापालिकेच्या प्रभाग समिती अ सभापती अनिता पाटील यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून खारघरच्या रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये रक्तादान शिबिराचा उपक्रम राबविला. त्यास प्रतिसाद लाभला.

या ठिकाणी नगरसेवक हरेश केणी, अभिमन्यू पाटील, रामजी बेरा, नरेश ठाकूर, भाजपचे जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, सरचिटणीस दीपक शिंदे, निर्दोष केणी, गैनिनाथ नावडेकर, विनय पाटील, वासुदेव पाटील, हर्षवर्धन सोनावणे आदी उपस्थित होते.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply