पनवेल : प्रतिनिधी
भारतीय जनता पक्ष उत्तर रायगड जिल्हा महिला मोर्चाच्या वतीने खांदा कॉलनी महिला मोर्चाची बैठक मंगळवारी (दि. 10) खांदा कॉलनीमधील सेक्टर 1 येथे आमदार प्रशांतदादा ठाकूर जनसंपर्क कार्यालयात घेण्यात आली. या बैठकीत समर्थ बूथ अभियान व इतर काही विषय या कार्यक्रमाची माहिती देण्यात आली. सर्व बूथ यादीचा आढावा घेण्यात आला. या वेळी भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष आश्विनी पाटील, सरचिटणीस मृणाल खेडकर, प्रिया मुकादम, नगरसेविका चारुशीला घरत, उपाध्यक्ष संध्या शारबिंद्रे, पनवेल शहर महिला मोर्चा अध्यक्षा वर्षा नाईक, मयूरी, खांदा कॉलनी महिला मोर्चा अध्यक्षा राखी पिंपळे, आशा मुंढे, संध्या जाधव, सोनाली सावंत, शैला मोरे, वारीजा गुजरान, मनीषा पाटील, कांती शेट्टी, विनोदा शेट्टी, उषा कांबळे, मंदाकिनी जाधव आदी उपस्थित होत्या.