Breaking News

कोशिश फाऊंडेशनच्या उपक्रमांतर्गत आयुक्त गणेश देशमुख यांच्या हस्ते वृक्षारोपण

पनवेल ः रामप्रहर वृत्त
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर अध्यक्ष असलेल्या कोशिश फाऊंडेशनच्या वतीने चला करूया वृक्षारोपण हे अभियान हाती घेण्यात आले आहे. या अभियानाचा शुभारंभ भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते खांदा कॉलनी येथील आयकर भवनजवळ करण्यात आला होता. या अभियानांतर्गत मंगळवारी (दि. 10) आयकर भवन येथे पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
कोशिश फाऊंडेशनच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत. फाऊंडेशनच्या वतीने पाच हजार झाडे लावण्याचा संकल्प केलेला असून या अभियानाची सुरुवात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते जागतिक पर्यावरण दिनी करण्यात आली होती. या उपक्रमात आतापर्यंत 900पेक्षा जास्त झाडे लावण्यात आली आहे. त्या अंतर्गत मंगळवारी खांदा कॉलनीतील आयकर भवन येथे महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी वृक्षारोपण अभियानात सहभागी झालेल्यांना आयुक्त देशमुख यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.
या कार्यक्रमास स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, प्रभाग समिती ‘क’ सभापती हेमलता म्हात्रे, नगरसेवक नितीन पाटील, अनिल भगत, मनोहर म्हात्रे, अजय बहिरा, प्रकाश बिनेदार, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, चेतन जाधव, चिन्यम समेळ, अभिषेक भोपी, आकाश भाटी, आयुब अकुला, अभिजित जाधव, सत्यवान नाईक आदी उपस्थित होते.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply