Breaking News

खालापूर डेल्टा प्लस मुक्त; एक रुग्ण बरा झाल्याने तणाव कमी

खालापूर : प्रतिनिधी

कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच डेल्टा प्लस विषाणूने चिंता वाढवली असून, खालापूर तालुक्यातील नोंद झालेला डेल्टा प्लस रुग्ण पूर्णपणे बरा झाल्याने सर्वांचा जीव भांड्यात पडला आहे. रायगडमध्ये नोंद झालेल्या दोन डेल्टा प्लस रुग्णांपैकी एक खालापूर तालुक्यातील लोधिवली येथील होता. 13 वर्षीय मुलाला डेल्टा प्लसची लागण झाली होती. ठाणे येथून हा मुलगा लोधिवली येथे आला होता. या मुलाच्या संपर्कात आलेल्या, तसेच कुंटुबातील सर्वांचे विलगीकरण करत त्यांना देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. सुदैवाने डेल्टा प्लसची लक्षणे इतर व्यक्तीमध्ये आढळून आली नाहीत. लागण झालेला मुलगादेखील पूर्णपणे बरा झाला आहे. त्यामुळे खालापूर तालुक्यावर आलेले डेल्टा प्लसचे संकट तूर्त टळले आहे.

तालुक्यात दुसर्‍या लाटेचा प्रभाव कमी होत असून कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू आहे. डेल्टा प्लसचा रुग्ण बाहेरून आला होता, तो पूर्णपणे बरा झाला आहे.

-डॉ. प्रसाद रोकडे, तालुका आरोग्य अधिकारी,खालापूर

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply