Breaking News

महामार्गावरील दरी पुलावरून कार कोसळली

पुणे ः प्रतिनिधी : सातारा ते मुंबई या नवीन महामार्गावरील जांभूळवाडीजवळील दरी पुलाजवळ पुण्याच्या दिशेने येणार्‍या कारचे नियंत्रण सुटल्याने ती पुलावरुन खाली कोसळली़. या अपघातात कारमधील दोघे जण एअरबॅगमुळे बचावले आहेत़ ही घटना शनिवारी सकाळी सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास घडली.

याबाबत अग्निशमन दलाचे अधिकारी संजय रामटेके यांनी सांगितले की, दरी पुलात कार कोसळल्याची माहिती मिळाल्यावर आमचे जवान तातडीने घटनास्थळी पोहचले. पुण्याच्या दिशेने येणार्‍या या कारचालकाचे वेगामुळे नियंत्रण सुटून ती कार दरीत सुमारे 100 ते 150 फूट खोल कोसळली़ कारने पलटी घेत पुन्हा चारही चाकांवर ती खाली पडली़. अपघातात कारचा मागचा भाग चेपला आहे़ कारच्या एअरबॅग उघडल्या गेल्याने पुढे बसलेले दोघे जण बचावले़, मात्र आम्ही तेथे पोहचण्यापूर्वीच ते वर येऊन निघून गेले होते़. त्यामुळे ते जखमी झाले आहेत की नाही याची माहिती मिळू शकली नाही़  ही पुण्यातील कार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply