Breaking News

…तर भारत तिसरी कसोटी सहज जिंकेल

लंडन : वृत्तसंस्था

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा सामना 25 ऑगस्टला सुरू होणार आहे. पण हा सामना सुरू होण्यापूर्वीच भारतीय संघासाठी एक आनंदाची बातमी आली आहे. त्यामुळे भारताला तिसर्‍या कसोटीत या गोष्टीचा चांगलाच फायदा होऊ शकतो.

भारताचा तिसरा सामना हेडिंग्ले या मैदानात होणार आहे. भारतीय संघ 2002 सालानंतर पहिल्यांदाच या मैदानात उतरणार आहे, पण या मैदानत उतरण्यापूर्वी भारतीय संघासाठी एक चांगली बातीम मिळाली आहे. कारण गेल्या 55 वर्षांमध्ये भारतीय संघ या मैदानात कसोटी सामना पराभूत झालेला नाही. कारण भारतीय संघाने 1967 सालानंतर या मैदानात एकही कसोटी सामना गमावलेला नाही. 1967 सालानंतर या मैदानात भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये दोन कसोटी सामने खेळवण्यात आले होते. पहिला सामना हा 1986 साली खेळला गेला होता आणि या सामन्यात भारतीय संघाने 279 धावांनी विजय मिळवला होता.

त्यानंतर भारत आणि इंग्लंड हे दोन्ही संघ 2002 साली या मैदानात पुन्हा एकदा एकत्र खेळायला उतरले होते. त्या वेळी भारताचे कर्णधारपद हे सौरव गांगुलीकडे होते. या सामन्यात भारताने पहिल्या डावात 8 बाद 628 अशी धावसंख्या उभारली होती. या सामन्यात सचिन तेंडुलकरने 193 धावांची खेळी साकारली होती, त्याचबरोबर राहुल द्रविड आणि गांगुली यांनी शतके झळकावली होती. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा पहिला डाव हा 273 धावांवर आटोपला. त्यावेळी भारतीय संघाने इंग्लंडवर फॉलोऑन लादला होता, पण दुसर्‍या डावातही इंग्लंडला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. इंग्लंडचा दुसरा डाव हा 309 धावांवर संपुष्टात आला होता. त्यामुळे भारताने या सामन्यात दणदणीत विजय साकारला होता.

जर या विक्रमानुसार सामन्याचा निकाल लागला, तर नक्कीच भारतीय संघ या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेऊ शकतो. दुसर्‍या कसोटीतील विजयानंतर भारताचे मनोबल उंचावलेले असेल. त्यामुळे या विक्रमाकडे पाहून भारतीय संघ अजून चांगली कामगिरी करू शकतो. त्यामुळे तिसर्‍या कसोटीत भारताची कशी कामगिरी होते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

Check Also

मोखाडा येथील लोकनेते रामशेठ ठाकूर महाविद्यालयात कला मंच आणि एआय केंद्राचे उद्घाटन

मोखाडा : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या मोखाडा येथील लोकनेते रामशेठ ठाकूर कला, विज्ञान व वाणिज्य …

Leave a Reply