Breaking News

आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली वाकडी-दुंदरे रस्त्याची पाहणी

डागडुजी करण्याची अधिकार्‍यांना सूचना

नवेल ः प्रतिनिधी
पनवेल तालुक्यातील वाकडी-दुंदरे रस्ता खराब झाला असल्याने त्याची आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकार्‍यांसह शनिवारी (दि. 4) पाहणी करून दुरूस्तीबाबत सूचना केल्या. सध्या ठाकूर इन्फ्राप्रोजेक्ट्स प्रा. लि. (टीआयपीएल) कंपनी स्वःखर्चाने येथील खड्डे भरणार आहे.
वाकडी-दुंदरे रस्ता खराब झाल्याच्या अनेक तक्रारी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर त्यांनी शनिवारी माजी जिल्हा परिषद सदस्य तथा भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरपंच अनुसया वाघ, गुरूनाथ भोपी, राजेश भोपी, रमेश पाटील, नामदेव जमदाडे, किशोर पाटील, शांताराम चौधरी, कचर पाटील, बाळाराम भोपी आदी पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह बांधकाम खात्याचे सहाय्यक अभियंता राठोड यांच्यासमवेत या रस्त्याची पाहणी केली.
  आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून 2515 मधून वाकडी-दुंदरे या रस्त्यासाठी 20 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत, तर रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी 30 लाख रुपये मंजूर झाले आहेत. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी रस्त्याची अवस्था पाहून बांधकाम खात्याचे सहाय्यक अभियंता राठोड यांना सूचना केल्या व या रस्त्याचे खड्डे भरण्याचे काम सध्या टीआयपीएल कंपनी स्वखर्चाने करणार असल्याचे सांगितले.

Check Also

खांदा कॉलनीतील ‘उबाठा’चे पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लागलेली गळती सुरूच …

Leave a Reply