Breaking News

सिफेरर्सना बूस्टर डोस तातडीने देण्याची मागणी

नवी मुंबई : बातमीदार

सिफेरर्सना बूस्टर डोस तातडीने मिळावा यासाठी ऑल इंडिया सिफेरर्स युनियनचे अध्यक्ष संजय पवार, कार्याध्यक्ष अभिजित सांगळे व शीतल मोरे यांनी केंद्रीयमंत्री मन्सूख मांडविय व राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पत्र लिहिले आहे. महामारीमध्ये संपूर्ण जगाचे कामकाज ठप्प झाले होते. मर्चंट नेव्ही सीफेरर्स आणि क्रूझ मरिनर्स या आघाडीच्या कामगारांद्वारे जलमार्गाद्वारे पुरवठ्याचा एकमेव स्त्रोत होता. ते लॉकडाऊन काळात काम करत होते आणि जगभरात आवश्यक वस्तू आणि औषधांचा पुरवठा करत होते. अशा आपत्कालीन परिस्थितीत आघाडीच्या कार्यकर्त्यांची भूमिका किती महत्त्वाची असते हे त्यांनी जगाला दाखवून दिले आहे. या सिफेरर्सना बूस्टर डोस तातडीने मिळावा यासाठी युनियनने आरोग्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. जे कोविडमध्ये तुम्ही सिफेरर्सला प्राधान्याने लस मिळण्यासाठी जी तातडीने निर्णय घेतले. त्यामुळे या कार्याला चांगली गती आली आहे, मात्र या सिफेरर्सना बूस्टर डोसदेखील तातडीने मिळणे गरजेचे आहे. बहुतांश सीफेरर्स हे क्रूज शिपवर नोकर्या करत आहे आणि संध्या न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, यूके, युरोपचे भाग, युएई, सिंगापूर यासारख्या बर्याच देशांनी बूस्टर डोस कंपलसरी हे धोरण अवलंबले आहे. भारत तसेच महाराष्ट्रामध्ये क्रुज आणि मर्चंट शिपिंग असे दोन्ही सिफेरर्स आहेत, बहुतांश आत्ता दुसरा डोस पूर्ण करून परत मायदेशी आली आहेत, बर्‍याच सिफेरर्सने दूसरी लस घेतली आहे. आय.सी.एम.आरच्या जुन्या निर्देशानुसार 28 दिवसांनी दूसरा डोस घेता येईल असे नमूद आहे, परंतु नवीन निर्देशानुसार हा बूस्टर डोसचा कालावधी वाढवून नऊ महिने केला आहे. ज्यांनी  दुसरा डोस घेतला आहे. त्यांची जॉयनिंग तारीख जवळ आली आहे, परंतू बूस्टर डोस न घेता आल्यामुळे त्यांना नोकरीवर रुजू होता आलेले नाही. याच अनुषंगाने लसीचा बूस्टर डोस यातील अंतर कमी करून पाच ते सहा महिने करण्यात यावा व वसई विरार तसेच पूर्ण भारतामधील सिफेरर्सला याचा जास्तीत जास्त फायदा व्हावा, अशी मागणी ऑल इंडिया सिफेरर्स आणि जनरल वर्कर्स युनियनने आरोग्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply