Breaking News

माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावर योग विषय आवश्यक विषय म्हणून घ्यावा; अखिल भारतीय योग शिक्षक महासंघांची मागणी; आमदार प्रशांत ठाकूर यांना निवेदन

पनवेल : रामप्रहर वृत्त

नव्या शैक्षणिक धोरणामध्ये योग विषय हा माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावर आवश्यक विषय म्हणून लागू करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करावे, असे निवेदन पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांना अखिल भारतीय योग शिक्षक महासंघाच्या वतीने रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष संतोष बहिरा यांनी दिले. या वेळी त्यांच्या सोबत अखिल भारतीय योग शिक्षक महासंघाच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य संगिता पाटील, रायगड जिल्हा मिडीया प्रमुख गणेश कोळी, रायगड जिल्हा कार्यकारिणी सदस्य रघुनाथ बहिरा उपस्थित होते. या निवेदनात भारतीय संस्कृतीमध्ये प्राचीन काळापासून योग अत्यंत महत्त्वपूर्ण विषय राहिलेला आहे. किंबहूना तो जीवनाचा अभिन्न भाग राहिला आहे. विशेष म्हणजे वैज्ञानिक दृष्टीने सुद्धा योगाचे महत्त्व सिद्ध झालेले आहे. मानवाला सर्वांगीण विकासासाठी योगा महत्त्वाचा विषय आहे. शारीरिक, मानसिक, सामाजिक तसेच अध्यात्मिक दृष्टीनेसुद्धा योगा महत्त्वपूर्ण भूमिका वटवू शकतो. शकतो. आपल्या प्राचीन धर्मग्रंथ जसे की, रामायण, महाभारत, वेद, उपनिषद व अन्य सर्व ग्रंथांमध्ये योगाबद्दल विस्तृत चर्चा आहे. याचा विस्तृत परिचय समाजाला व्हावा म्हणून 2014मध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल उचलून संयुक्त राष्ट्र परिषदेमध्ये झालेल्या चर्चेनुसार एकंदर 90 दिवस चर्चा घडवून आणली व आज जगातील 140 देशांमध्ये योग शिक्षणाला मान्यता मिळालेली आहे. ही अत्यंत गौरव गौरवास्पद बाब आहे. अशा महत्त्वाच्या विषयाला आपल्या विकास कार्यक्रमांतर्गत भारतातील प्रत्येक शैक्षणिक संस्थांमध्ये योगाचे योग्य शिक्षण दिले जावे, अशी अपेक्षा आहे. बाल्यावस्थेपासून विद्यार्थी जीवनामध्ये मुलांना जर योगाचे महत्व व मूल्य समजले तर या कच्च्या घड्यांना घडविताना देश अजून सक्षम होईल. अशी भूमिका भारतीय योग्य परिषदेने घेतली आहे तसेच शरीर स्वास्थ्यासाठी सुद्धा योग शिक्षण काळाची गरज आहे. बालकांच्या मनावर देशभक्तीचे सुसंस्कार करण्यासाठीसुद्धा योग शिक्षणाची आवश्यकता आहे. सध्याची स्थिती ही विद्यार्थी जीवनापासूनच सक्षम होण्यासाठी शारीरिक व मानसिक सुदृढता अत्यावश्यक आहे. मानसिक शारीरिक व बौद्धिक विकासासाठी सुद्धा योग शिक्षण काळाची गरज आहे यावर जोर दिल्यास देश सक्षम, निरोगी शकेल तसेच सर्व येणार्‍या काळाची आव्हाने तो सहज व कुशलतेने हाताळू शकेल. ज्याप्रमाणे योग शिक्षणामुळे युजीसी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थांमध्ये लाखो बेरोजगार योग शिक्षक म्हणून रोजगार प्राप्त होईल तसेच अवैध्य पध्दतीने योग शिक्षण देणार्‍या लोकांवर सुध्दा अंकुश येईल, असे निवेदनात म्हटले आहे.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply