Breaking News

उरण नगरपरिषदेतर्फे ग्रेव्ही प्रीमिक्सचे प्रशिक्षण

उरण : वार्ताहर

नगरपालिकेतर्फे श्री समर्थ कृपा सखी संस्थेने ग्रेव्ही प्रीमिक्सचे प्रशिक्षण सोमवारी (दि. 6) दिले. हे प्रशिक्षण दोन दिवसांचे होते. पहिल्या दिवशी व्हाइट ग्रेव्ही, गोल्डन ग्रेवी, रेड ग्रेव्ही, ग्रीन ग्रेव्ही, ब्राऊन ग्रेव्ही, दाल मखनी मसाला, मोगलाई ग्रेव्ही मसाला, बिर्याणी ग्रेव्ही मसाल्याचे प्रीमिक्स बनवून दाखवण्यात आले, तसेच ढोकळाही बनवून दाखवण्यात आला. दुसर्‍या दिवशी हे सर्व प्रीमिक्स वापरून भाज्या कशा बनवायच्या ते दाखवण्यात आले. त्यामध्ये मलई मेथी, दम आलू, पिंडी छोले, व्हेज कोल्हापुरी, एक्झॉटिक करी, दाल मखनी व व्हेज तवा बिर्याणी दाखवण्यात आले, तसेच सरबत प्रीमिक्स रसना कसे बनवायचे त्याचेदेखील प्रशिक्षण देण्यात आले आणि इन्स्टंट मोदक पानमसाला व गुलकंद हेदेखील दाखवण्यात आले. सर्व महिलांनी त्याचा आस्वाद देखील घेतला. हे प्रशिक्षण श्वेता चिंगळे यांनी दिले.

या वेळी नगराध्यक्ष सायली म्हात्रे, महिला बालकल्याण सभापती स्नेहल कासारे, नगरसेविका दमयंती म्हात्रे, भाजप शहराध्यक्ष संपूर्णा थळी, नगरपालिकेचे संजय पवार आदी  उपस्थित होते. 5 सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचा देखील या वेळी सत्कार करण्यात आला. या प्रशिक्षणासाठी श्री समर्थ कृपा सखी स्वयंसाहाय्यता संस्थेच्या अध्यक्षा संगीता ढेरे व त्यांच्या सहकार्‍यांनी मेहनत घेतली.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply