Breaking News

सीकेटी मराठी प्राथमिक विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा

पनवेल : रामप्रहर वृत्त

चांगू काना ठाकूर मराठी प्राथमिक विद्यालय, नवीन पनवेल येथे रायगड जिल्हा खाजगी प्राथमिक शाळा कर्मचारी संघटनेतर्फे शनिवारी (दि. 4) शिक्षक दिनानिमित्त संघटनेच्या वतीने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा गुलाबपुष्प व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी रा. जि. खा. प्रा. शाळा कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस यशवंत मोकल, कळंबोली सुधागड एजुकेशन सोसायटी शाळेतील पगार सर उपस्थित होते. सीकेटी मराठी प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक व रा. जि. खा. प्रा. शाळा कर्मचारी संघटना, पनवेल-उरण तालुका कमिटीचे कार्याध्यक्ष सुभाष मानकर यांनी उपस्थित पाहुण्यांचे पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन स्वागत केले.

या वेळी यशवंत मोकल यांनी संघटना कशी तयार झाली, संघटनेचे महत्त्व काय, संघटना कशासाठी असायला हवी याची सविस्तर माहिती शिक्षकांना सांगितली, तसेच संघटनेतर्फे राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती सांगितली. प्रमुख अतिथींच्या हस्ते विद्यालयाच्या क्रीडांगणावर एक बहुगुणी कडुलिंबाचे झाड संघटनेचे प्रतिक म्हणून लावण्यात आले व ‘एक शाळा एक झाड’ हे संघटनेचे  उद्दिष्ट अमलात आणले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे सहायक शिक्षक पंढरीनाथ जाधव यांनी केले, तर कार्यक्रमाला उपस्थित अतिथींचे, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.

Check Also

खारघरमध्ये महिलांसाठी क्रिकेट; स्पर्धा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

खारघर : रामप्रहर वृत्तखारघरमध्ये जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेचे …

Leave a Reply