सांगली ः प्रतिनिधी
दिवाळीपर्यंत आम्ही पुराव्यासह महाविकास आघाडी सरकामधील मंत्र्यांचे सर्व घोटाळे सिद्ध करू. तेव्हा उद्धव ठाकरे यांची इलेव्हन सेना तुरुंगात जाईल, तसेच जितेंद्र आव्हाड यांनीदेखील आता जेलमध्ये जाण्यासाठी बॅग भरून बसावे, असा इशारा भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिला आहे. सांगलीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांना सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) नोटीस देण्यात आली असून त्यांची चौकशी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी सोमवारी (दि. 6) खरमाटे यांच्या सांगली जिल्ह्यातील तासगाव येथील वंजारवाडी भागात असलेल्या फार्महाऊसची आणि अन्य ठिकाणच्या मालमत्तांची पाहणी केली. त्यानंतर सांगलीत आयोजित पत्रकार परिषदेमधून त्यांनी उद्धव ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला. अनिल देशमुख फरारी, तर उद्धव ठाकरे यांचे दुसरे अनिल जेलमध्ये जाण्याची प्रकिया सुरू झाली आहे, असे सोमय्या म्हणाले.
Check Also
भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …