लंडन ः येथील केनिंग्टन ओव्हल मैदानावर भारतीय क्रिकेट संघाने विजयी तिरंगा फडकावला आहे. अत्यंत रोमांचक ठरलेल्या चौथ्या कसोटीत विराटसेनेने इंग्लंडला 157 धावांनी हरवले आणि 50 वर्षांचा दुष्काळ संपवला. पाचव्या दिवसअखेर इंग्लंडला 291 धावांची गरज होती, शिवाय त्यांच्याकडे संपूर्ण संघ फलंदाजीसाठी शिल्लक होता, पण भारतीय गोलंदाजांनी जबरदस्त आक्रमण करीत इंग्लंडच्या फलंदाजांना एकामागोमाग एक तंबूत धाडले. लंचनंतर खेळपट्टीने आपला रंग बदलला आणि रवींद्र जडेजासह जसप्रीत बुमराहने आपले कौशल्य दाखवायला सुरुवात केली. 1971मध्ये भारताने अजित वाडेकर यांच्या नेतृत्वात या मैदानावर शेवटचा कसोटीविजय नोंदवला होता. भारताने या विजयासह मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे.
Check Also
अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा
आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …